म्हाडाच्या लाॅटरीची तारीख जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |

 
 

मुंबई : मुंबईतील स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. दिवाळीपूर्वी मुंबई मंडळ म्हाडाच्या १ हजार १९४ घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. एका पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यंदा दिवाळी ७ नोव्हेंबरला आहे. म्हणजेच त्यापूर्वी म्हाडाची लॉटरी निघेल अशी माहिती त्यांनी दिली.

 

यापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निघणार असे सांगितले होते. कोकण मंडळाच्या घरांची लॉटरीची सोडत गेल्या महिन्यात निघाली. त्यावेळी महेतांनी ही घोषणा केली होती. मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीची उत्सूकतेने वाट पाहत असतात. परवडणारी घरे म्हणून म्हाडाच्या घरांकडे मुंबईकरांचा ओढा कायम आहे. गेल्या काही वर्षात म्हाडाच्या घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांना परवडतील अशा घरांची लॉटरी असणार असे म्हाडातर्फे सांगण्यात आले. यंदा म्हाडाच्या लॉटरीत कमी किमतीतील घरे मोठ्या संख्येने उपलब्ध होणार आहेत.

 

पाहा कुठे निघणार घरे

 

एन्टॉप हिल, वडाळा

उत्पन्न गट – अत्यल्प

घरे – २७८

किंमत – ३० लाख ७१ हजार

 

प्रतीक्षानगर शीव

उत्पन्न गट – अत्यल्प

घरे – २७८

किंमत – २८ लाख ७० हजार ७००

 

प्रतीक्षा नगर, शीव

उत्पन्न गट - अत्यल्प

घरे – ५

किंमत – १६ लाख ४० हजार

 

पीएमपीजी मानखुर्द

उत्पन्न गट – अत्यल्प

घरे – ११४

किंमत – २७ लाख २६ हजार ७५७

 

गव्हाणपाडा, मुलुंड

उत्पन्न गट – अल्प

घरे – २४

किंमत – ३० लाख ८५ हजार

 

सिद्धार्थ नगर, गोरेगाव

उत्पन्न गट – अल्प

घरे – २४

किंमत – ३१ लाख ८५ हजार

 

पंतनगर, घाटकोपर

उत्पन्न गट – मध्यम

घरे – २

 

टगोरनगर, विक्रोळी

उत्पन्न गट – मध्यम

घरे – ७

 

महावीर नगर, कांदिवली

उत्पन्न गट – मध्यम

घरे – ७

 

पंतनगर ओबी, घाटकोपर

उत्पन्न गट – उच्च

घरे – २

 

सहकारनगर

उत्पन्न गट – उच्च

घरे – ८ लाख

 

बदानी चाळ, परळ

घरे – ६८

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@