पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जाणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |


 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका


मुंबई : पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचही जणांना गजाआड पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या पाच जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे असून आम्ही ते कोर्टात सादर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना केलेल्या अटकेचे सर्वोच्च न्यायालयाने समर्थन केले आहे. या पाच जणांच्या अटकेत कोणतेही राजकारण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.

 

वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवाद्यांशी संबंध ठेवणे पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहेत. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. . एम. खानविलकर न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या कारवाईचे समर्थन करून मध्यस्तीस नाकार दिला आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे सांगत कारवाई योग्यच असल्याचे हे खंडपीठ म्हणाले. या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करत पाच जणांनी देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याचे पुणे पोलिसांनी पुरावे देखील सादर केले आहेत. तसेच अजूनही आमच्याकडे भक्कम पुरावे असून आम्ही ते कोर्टात सादर करणार असल्याचे देखील सांगितले.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे गजाआड जातील. अशा लोकांचे समर्थन करण्याअगोदर आपण कोणाचे समर्थन करतो याचा विचार केला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेविरुद्ध रोमिला थापर, देवकी जैन, प्रभात पटनायक, सतीश देशपांडे माया दारुवाला यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@