काँग्रेस पक्ष म्हणजे मुर्खांचे ठिकाण : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |

 

 

नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी पाच जणांवर केलेली कारवाई योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिखट शब्दात टिका करताना, 'मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय', असा टोला लगावला आहे. अमित शहा यांनी ट्विट करून काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. 'मूर्खांचं एकमेव ठिकाण म्हणजे काँग्रेस होय. भारताची तुकडे तुकडे गँग, माओवादी, नकली कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांचे समर्थन करून ईमानदारीत काम करणाऱ्यांना बदनाम करणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसचे स्वागत आहे', अशी खोचक टीका शहा यांनी केली आहे.
 
 
 
शहा म्हणाले, “या लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेचे राजकारण करून त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्या सर्वांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे शहरी नक्षलवादावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेससाठी हीच योग्य वेळ असल्याचा टोलाही शहा यांनी हाणला आहे. शहा यांनी यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर एकापाठोपाठ तीन ट्विट केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्येही त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

 

 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@