शहीद भगतसिंग यांची 'ही' पिस्तूल पाहिली का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |



अलाहाबादच्या संग्रहायलात नागरिकांना पाहता येणार

 

नवी दिल्ली : शहीद भगतसिंग यांची आज आज जयंती. भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या क्रांतिकारांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. तरुण वयातच त्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी क्रांतिकारी मार्ग पत्करला होता. भगतसिंग यांचे कार्य देशातील तरुणांना अधिकाधिक माहिती व्हावे यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

भगतसिंग सहकाऱ्यांनी एप्रिल १९२९ रोजी दिल्ली विधानसभा हॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. तसेच ब्रिटीश अधिकारी सँडर्स यांना गोळ्या घातल्या होत्या. त्यांनी ज्या पिस्तुलने गोळ्या घातल्या ते पिस्तूल इंग्रजांनी हस्तगत केले होते. तेच पिस्तूल आता अलाहाबादच्या संग्रहायलात ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार हे पिस्तूल या संग्रहालयात ठेवण्यात आले असून नागरिकांना पाहण्यासाठी खुले केले आहे.

 

 
 

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याची लोकांना माहिती व्हावी, नागरिकांमध्ये देशाविषयी अभिमान निर्माण व्हावा, यासाठी हे पिस्तुल पाहण्यासाठी खुले करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. भगतसिंग यांनी वापरलेली ४६० एम १६८८९६ जी १९६८ ही पिस्तूल अमेरिकन बनावटीची आहे. त्यामुळे अलाहाबादच्या कुंभमेळ्याला येणाऱ्या हजारो भाविकांना पर्यटकांना ही पिस्तूल पाहता येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@