केरळ सेसवर चर्चेसाठी सात सदस्यांची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2018
Total Views |

 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीसाव्या जीएसटी कौन्सिलमध्ये केरळ उपकर (सेस), राज्यांतील वित्तीय तूट आदींवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. अरुण जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी यात सहभाग घेतला होता. केरळच्या मदतीसाठी उपकर लावण्याबाबत विविध राज्यांच्या मंत्र्यांशीही जेटलींनी या बैठकीत चर्चा केली आहे. त्यात केरळला दुर्घटनेतून सावरण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा झाली.
 

जेटली म्हणाले, आज झालेल्या बैठकीत राज्यातून जमणाऱ्या महसुलावर चर्चा करण्यात आली आहे. राज्यांतर्गत वित्तीय तूटीत घट होत असून परीस्थिती सुधारत आहे. पूर्वोत्तर राज्यांमधून येणाऱ्या महसुलातही वाढ होत आहे. मात्र, तुलनेने या राज्यातून मिळणारे उत्पन्न हे सध्या कमी आहे. या राज्यात सरकारतर्फे अध्यक्षीय समिती सदस्यांना पाठवून अहवाल मागवण्यात आला आहे.” ज्या राज्यांतून महसूल मिळण्याची अपेक्षा होती. त्याच्याकडून सुमार कामगीरी झाल्याचेही ते म्हणाले.

 

         माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@