पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले 'चॅम्पियन ऑफ द अर्थ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' ठरले आहेत. त्यांना संयुक्त राष्ट्र संघांचा अत्यंत प्रतिष्ठेचा मनाला जाणारा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सौर ऊर्जा आणि पर्यावरणाबाबतची जागृती केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यासोबतच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘पॉलिसी लीडरशिप या विभागात पंतप्रधान मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रोन या दोघांना हा पुरस्कार देण्यात आला.

 
 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावर सौर ऊर्जा संबंधित प्रभावी काम केल्यामुळे आणि २०२२ पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याच्या संकल्पनेमुळे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यासोबतच अन्य ५ जणांना देखील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबतच कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही अक्षय ऊर्जेच्या वापरासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. कोच्ची विमानतळ हे पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारे विमानतळ आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@