विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |

 

 

 
 
 
 
नवी दिल्ली : विवाहबाह्य संबंध ठेवणे हा गुन्हा नाही. स्त्री आणि पुरुष दोन्ही समान आहेत. पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही. असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. व्यभिचाराला गुन्हा ठरविणारे भारतीय दंडसंहितेचे कलम ४९७ हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले आहे.
 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. व्यभिचार हा गुन्हा नसला तरी स्त्री किंवा पुरुष त्यांच्या जोडीदाराने विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या कारणाने घटस्फोट घेऊ शकतात. जोसेफ शाइन यांनी याचिका दाखल करून विवाहबाह्य संबंधांविषयीच्या कायद्याला आव्हान दिले होते. भारतीय दंडसंहितेचे कलम ४९७ हे महिला सन्मानाच्या विरुद्ध आहे. महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले.

 
हा कायदा मनमानी करणारा असल्याने तसेच तो स्त्रियांची मानहानी करणारा असल्याने अवैध ठरविण्यात येत आहे. लग्नानंतरही एखाद्या व्यक्तिला लैंगिक पसंतीपासून रोखता येणार नाही असे न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी सांगितले. व्यभिचार करणे हा गुन्हा नाही परंतु जर एका जोडीदाराने विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे दुसऱ्या जोडीदाराने आत्महत्या केली तर मात्र त्याला किंवा तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व्यभिचार करणाऱ्या जोडीदारावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@