नाशिकमध्ये ई-कनेक्ट अ‍ॅपला मोठा प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |
 
 
 

नाशिक : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहे. या अ‍ॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या जुन्या अ‍ॅपचे नूतनीकरण करून त्यात अनेक सुविधा दिल्या आहेत.

 

विशेष म्हणजे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकार्याने चोवीस तासांत ती तक्रार ओपन केली नाही तर त्यालाअ‍ॅसटो जनरेटेड मेमो’ बजावला जात असल्याने अधिकार्‍यांनी या अ‍ॅपला खूप गांभीर्याने घेतले आहे. इतकेच नव्हे तर खातेप्रमुखांनादेखील तक्रारींचे निराकरण न झाल्यास जबाबदार धरून चौकशी केली जात असल्याने तक्रार करताच सत्वर कारवाई केली जात आहेप्रशासनाकडे आत्तापर्यंत २२ हजार, ७६८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २२ हजार, ३७० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. म्हणजेच ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी महापालिकेने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनादेखील तक्रार निराकरणाचा सुखद अनुभव येत आहे.

 
 

महापलिकेच्या ४३ सेवा ऑनलाईन : महापालिकेने विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्यांसाठी आता ऑनलाईन व्यवस्था केली असून, त्यानुसार ४३ प्रकारच्या परवानग्या दिल्या जात आहेत.

 
 

नागरिक म्हणतात सेवा चांगलीच : महापालिकेच्या या अॅपवर रेटिंगचीदेखील सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने चांगली सेवा दिल्याचा अभिप्राय संकेतस्थळावर नागरिकांनी नोंदविला आहे. एखादी तक्रार नोंदविल्यानंतर तिच्या निराकरणानंतर नागरिकांना काय वाटते याबाबत क्रमवारीची सुविधा देण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@