पुण्यात हाहाकार; सगळीकडे पाणीच पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |


 

 

पुणे : जनता वसाहत येथे मुठा कालव्याची भिंत फुटून सिंहगड रस्त्यावर व दांडेकर पुलावर पाणीबाणी परस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून यामुळे नागरिकांची त्रेधात्रिपट उडाली आहे. खडकवासला धरणाचा मुठा हा उजवा कालवा आहे. यामुळे नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले असून मोठी वाहतूक खोळंबली आहे. कालव्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम चालू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

 
 
 

या पुरपरिस्थितीमुळे जवळपास ७० ते ८० घरे वाहून गेले असून अनेक घरांच्या भिंती पडल्या आहेत. आपत्तीग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सिंहगड रस्ता, दांडेकर पुल, सारसबाग, निलायम, दत्तवाडी, टिळक रोड, नळस्टॉप इत्यादी भागात मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, अग्निशमन दल व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पाटबंधारे विभागाला याबाबत माहिती काळातच हा कालवा बंद केला आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे.

 

...आणि १९६१ च्या आठवणी ताज्या झाल्या

 

यापूर्वी देखील १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरणाला मोठी भेग पडल्याने पुण्यात हाहाकार माजला होता. याच पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने खडकवासला धरण फुटले होते. यात एक हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते तर लाखो जणांचे संसार उध्वस्त झाले होते. या दुर्घटनेनंतर देखील प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नसल्याचे मुळा कालवा फुटल्याने समोर आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@