ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत भाजपचे घवघवीत यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |
 
 
  
 
पनवेल : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळविले. गव्हाण, वहाळ, वांगणी, तर्फेवाजे, नांदगाव, पळस्पे, देवद, पारगाव, पोयंजे, विचुंबे, आदई या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यामधील विचुंबे व आदई ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप व शेकापने बिनविरोध केली. उर्वरित ग्रामपंचायतीची निवडणूक बुधवार दि. २६ सप्टेंबरला पार पडली. त्याचा निकाल गुरुवारी तहसीलदार कार्यालयात जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने बहुमताने विजय मिळवत भरघोस यश संपादन केल्याने एकूणच या निवडणुकीतही भाजपचा करिष्मा पाहायला मिळाला.
 
 
 

गव्हाण ग्रामपंचायतीत भाजप, शेकाप, काँग्रेस आघाडीच्या सरपंच म्हणून हेमलता अजय भगत विजयी झाल्या असून शिल्पा किरण कडू, हेमंत कृष्णा पाटील, उषा महेंद्र देशमुख, कामिनी प्रमोद कोळी, अरुण मधुकर कोळी, विजय हिरा घरत, रोशन हिरालाल म्हात्रे, माई प्रकाश भोईर, सचिन रघुनाथ घरत, योगिता सुहास भगत, सुनिता गजानन घरत हे उमेदवार निवडून आले. वहाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार पूजा पाटील विजयी झाल्या असून प्रमोद कडू, गीता ठाकूर, अमर म्हात्रे, योगिता नाईक, मंजुळा कोळी, प्रशांत पाटील, चेतन घरत, अर्चना नाईक, दीपाली पाटील, अमित घरत, शैला पाटील विजयी झाले. वांगणी, तर्फेवाजे ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून भाजपच्या सुरेखा अशोक पवार निवडून आल्या असून, अक्षता प्रवीण म्हात्रे, माधुरी तुकाराम पाटील, संतोष गोपाळ शेळके, संपदा प्रवीण पालव, सुवर्णा पाटील व लीला वाघमारे हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीत भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस युती अर्थात नंदादेवी ग्रामविकास आघाडीचा विजेता मनोहर भोईर सरपंच म्हणून निवडून आला आहे, तर सदस्य म्हणून अर्चना पाटील, विक्रम फडके, सरिता पाटील, दीपक ठोंबरे, धनश्री ठोंबरे, पळस्पे ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून भाजपचे चंद्रकांत भोईर विजयी झाले आहेत, तर सदस्य म्हणून दिनेश बेडेकर, रेखा दामोदरे, अजय तेजे, सपना वारके, विजय गवंडी, विकास भगत, अनिता नाईक, अरुणा भोईर, प्रकाश चौधरी, नीता ठाणगे, पोयंजे ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेना युतीचे जगदीश मते सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. सदस्य म्हणून गणेश शितकणगे, रोहिणी चोरगे, मंदा मते तसेच देवद ग्रामपंचायतीत विनोद वामन वाघमारे, अश्विनी हिरामण ठोकळ, दिनेश रामभाऊ वाघमारे, दीपाली संजय पाटील, संतोष दत्तात्रेय वाघमारे विजयी झाले. विजयी उमेदवारांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि मान्यवरांनी अभिनंदन केले.

 
 

खापरी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता - तालुक्यातील अत्यंत चुरशीची व आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणून टोकावडे परिसरातील खापरी ग्रामपंचायतीकडे पाहिले जात होते. आजपर्यंत खापरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादीने अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मतदारांनी आ. किसन कथोरे यांच्या विकास कामांच्या बाजूने कौल दिला. तालुक्यातील राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली खापरी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मुरबाड तहसीलदार कार्यालयात पार पडली. सात सदस्यांची असलेल्या या ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र. दोनमध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तसेच सातपैकी सहा जागा भाजपने पटकावत राष्ट्रवादीचे बहुमताचे स्वप्न धुळीस मिळवले. यावेळी अशोक राऊत, सुधाकर माळी, नंदा बांगरा, विमल राऊत व प्रमिला सूर्यराव हे भाजपचे तीन सदस्य निवडून आले, तर हंसा मेंगाळ, नरेंद्र खोडका हे दोन सदस्य बिनविरोध आले होते. सरपंचपदी मनिषा पारधी ३५1 मते मिळवून निवडून आल्या आहेत. नागपूरमध्ये ग्रामपंचायतीवर काँग्रेस नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे, तर काही काही तालुक्यांतील प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले. काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी विजय मिळविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्म गाव असलेल्या धापेवाडा येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंचपदी निवडून आले, तर धापेवाड्यात काँग्रेस समर्थित पॅनेलचे 1६ तर भाजप समर्थित पॅनेलचा एक उमेदवार निवडून आला. यासोबतच ‘खासदार दत्तक ग्राम योजनें’तर्गत गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उषा ठाकरे यांनी विजय मिळवला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@