छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँगचा लिलाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2018
Total Views |
 
 

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शिलापूर येथील भुजबळ यांच्या मालकीच्या ‘आर्मस्ट्राँग कंपनी’च्या लिलावाची नोटीस नाशिक मर्चंट बँकेने झळकविली आहे. थकीत कर्जामुळे पाच महिन्यांपूर्वी भुजबळांच्या शिलापूर येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर आता जाहीर लिलाव विक्री करण्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात हा लिलाव पार पडणार आहे. या कंपनीकडे ४ कोटी, ३४ लाख, ४३ हजार, १८३ रुपये १ एप्रिल २०१७ पासून थकले आहेत. त्यावरील व्याज व मूळ थकीत रक्कम आता या लिलावातून वसूल केली जाणार आहे.

 
 

मर्चंट बँकेडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आणि नाशिकचे माजी खा. समीर भुजबळ, पुत्र आ. पंकज भुजबळ यांच्यासह आप्पा केसकर यांनी कर्ज घेतले होते. त्यांना जामीनदार व संमतीदार म्हणून नितीन राका, दिलीप खैरे, विशाखा भुजबळ व शेफाली भुजबळ यांनी संमती दिली होती. त्यानंतर कर्ज मंजूर करण्यात आले होते पण, हे कर्ज थकल्यामुळे बँकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कंपनीची राखीव किंमत आठ कोटी, बावीस लाख, अठरा हजार ठेवण्यात आली आहे. दि सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेटस अ‍ॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ च्या नियम ८ अन्वये हा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात जागेचे वर्णन दिले असून, पाच मिळकती असल्याचे म्हटले आहे. पाचही बिनशेती मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ४ हजार २५० चौरस मीटर आहे. त्यावर ६००.४७ चौ.मी बांधीव क्षेत्र आहे.

 
 

भुजबळांना धक्का : विविध आरोपांखाली तुरुंगवास भोगलेले आणि सध्या जामिनावर मुक्त असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खा. समीर भुजबळ यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भुजबळांच्या कंपनीचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर त्यांनी ही रक्कम न भरल्यामुळे आता या कंपनीचा लिलाव होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@