केंद्रीय कर्मचाऱ्यांना २ वर्ष मोफत विमानप्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |


 


लीव्ह ट्रॅव्हल स्कीम (एलटीसी) योजनेच्या मुदतीत दोन वर्षांची वाढ

 

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर असून आता त्यांना वर्षे मोफत विमानप्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारने लीव्ह ट्रॅव्हल स्कीम (एलटीसी) योजनेच्या मुदतीत दोन वर्षांची वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एलटीसी योजनेला सरकारने २०१४ मध्येच मंजुरी दिली होती. त्यात आता दोन वर्षाची वाढ करण्यात येणार असल्याचा अध्यादेश कामगार मंत्रालयाने जारी केला आहे.

 

या नवीन अध्यादेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर, उत्तर पूर्व क्षेत्र, अंदमान-निकोबार बेटांवर विमानाने मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे ४८.८१ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून २६ सप्टेंबर २०१८ ते २५ सप्टेंबर २०२० पर्यंत कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@