पश्चिम बंगाल बंद; कार्यकर्ते संतप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |



 

कोलकत्ता : दीराभीत हाईस्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूच्या निषेदार्थ आज पश्चिम बंगालमध्ये बंद पाळण्यात आला. भाजप आणि अभाविप तर्फे हा कडकडीत बंद पाळण्यात आला असून यावेळी संतप्त कार्यकर्त्यांचा ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध मोठा रोष पाहायला मिळाला. पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या राजेश सरकार आणि तपन बर्मन यांच्या मृत्यूला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. अभाविपच्या या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

 
 

भाजपा अभाविपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदवेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पाहायला मिळाली. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बंद अयशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केला. मात्र भाजपा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हणून पाडत टीएमसीच्या कार्यकर्त्यांना जशासतसे उत्तर दिले. यावेळी ममता सरकारवर हल्ला चढवताना बांगला भाजपाचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी बॅनर्जी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुंडागर्दीचा आरोप लावला.

 

काय आहे घटना?

 

उत्तर बंगाल भागातील दिनाजपुर जिल्ह्यातील दीराभीत हाईस्कूलमध्ये नवीन शिक्षकांच्या भरतीवरून पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. नवीन तीन शिक्षकांची भरती केल्यावरून नाराज अभाविपच्या विद्यार्थ्यांनी संवैधानिक मार्गाने आंदोलन पुकारले होते. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला गोळीबार केला. यात दोन विद्यार्थी कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. तर १० विद्यार्थी जखमी झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@