ऐतिहासिक; न्यायालयाच्या निकालाचे थेट प्रेक्षपण होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |


 

नवी दिल्ली : न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक निकाल दिला आहे. भविष्यात न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रेक्षपण करता येऊ शकते. यामुळे न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. याची सुरुवात सर्वोच्च न्यायालयापासूनच होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिली. इंदिरा जयसिंह यांनी थेट प्रेक्षपणाची याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

 

देशातील महत्वाच्या सुनावणीच्या थेट प्रेक्षपण करावे, पाश्चात्य देशात थेट प्रेक्षपण करण्याची पद्धत असून भारतीय नागरिकांचा तो संविधानिक अधिकार आहे. यावर न्यायालयाने सकारात्मक विचार करावा. असे इंदिरा जयसिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. यावर न्यायालायने आज सुनावणी करत थेट प्रेक्षपण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणाले की, "थेट प्रसारणामुळं न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. लोकहिताच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे. मात्र यामध्ये जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील." सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. . एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी हा निकाल दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@