आधार कार्ड वैधच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली: आधार कार्ड वैधच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. आधार सक्तीवरून व आधारच्या सुरक्षितेवरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे. यासोबतच आधार ही देशातील सामान्य नागरिकाची ओळख असून कोणतीही खासगी कंपनी किंवा मोबाईल कंपन्या आधार कार्डसाठी सक्ती करू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आधारच्या सक्तीविरोधात व गोपनीयतेच्या प्रश्नावर न्यायालयात २७ याचिका दाखल झाल्या होत्या. यावर गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने अखेर आज यावर निर्णय देत आधारला आधार दिला आहे.

 

आधार पॅन कार्डशी लिंक करण्याचा निर्णय कायम राखत कोर्टाने आधार बँक खाते आणि मोबाईलशी लिंक करण्याचा निर्णय रद्द केला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, "आधार सामान्य नागरिकाची ओळख आहे. यामुळे समाजातील मोठ्या वर्गाला शक्ती मिळाली. आधारवरून माहिती चोरली जाऊ शकते हे आरोप चुकीचे आहेत. बायोमेट्रिक डेटाची नक्कल करणे आणि आधारचे डुप्लिकेट तयार करणे शक्य नाही. सरकारचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याचा निर्णय योग्यच आहे." यासोबतच शाळांमध्ये आधारची सक्ती करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@