मोदी सरकरचा राफेल करार फायदेशीर- वायुदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |



 


नवी दिल्ली: राफेल करारावरून वादंग चालू असताना वायुसेनेकडून महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भारतीय वायुसेनेचे उप-प्रमुख एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांनी राफेल विमान चालवण्याचे परीक्षण केले. त्यानंतर रघुनाथ यांनी या विमानांचे कौतुक केले आहे. मोदी सरकारचा ३६ राफेल विमानांचा करार हा पूर्वीच्या युपीए सरकारच्या करारांपेक्षा अधिक चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. या राफेल विमानांमुळे आम्ही आनंदी आहोत असेही त्यांनी सांगितले.

 

रघुनाथ यांनी काँग्रेसचे नाव न घेता सांगितले की या कराराबद्दल लोकांना चुकीची माहिती दिली जात आहे. एकीकडे राहुल गांधी उलटसुलट आरोप करत असताना ज्या वायुदलासाठी हि विमाने खरेदी करण्यात आली त्यांनी प्रशंसा केली आहे. हि विमाने सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या डीलमध्ये ऑफसेट काँट्रॅक्टच्या नावाने ३०,००० कोटी रुपयांची बाब नसून 'डसॉल्ट एव्हिएशन' कंपनी केवळ ६५०० कोटींचेच कॉन्ट्रॅक्ट देईल, त्यापेक्षा जास्त नाही, असेही रघुनाथ यांनी स्पष्ट केलं.

 

राफेल करारामुळे आम्हाला आधुनिक तंत्रज्ञान, चांगला मेंटेनन्स आणि दर्जेदार सुविधा मिळत असल्याचे मार्शल रघुनाथ यांनी सांगितले. एअरफोर्सचे डेप्युटी चीफ शिरीष बबन देव यांनीही या डीलचे कौतुक केलं आहे. या करारामध्ये कंपनीचं अर्थकारण पणाला लागलं असल्याने या करारात सरकार दबाव टाकू शकत नाही, अशी माहिती देव यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@