‘मी शिवाजी पार्क’ सिनेमा अडचणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : ‘मी शिवाजी पार्क’ हा सिनेमा सध्या सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला आहे. महेश मांजरेकरांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, विक्रम गोखले, सतीश आळेकर अशी या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. १८ ऑक्टोबर ही या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख असून अद्याप या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही.
 

सिनेमातील एका वाक्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. हे वाक्य न्यायव्यवस्थेच्या विरोधात असल्याचे सेन्सॉरचे मत आहे. परंतु सिनेमाच्या निर्मात्यांनी हे वाक्य सिनेमातून काढण्यास नकार दिल्याने सिनेमाच्या प्रदर्शनाला अडथळा निर्माण होतो की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिनेमातील ते वाक्य आम्ही काढणार नाही अशा आशयाचे एक पत्र निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाला ५ सप्टेंबर रोजी पाठवले होते. पण त्या पत्राला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून उत्तर मिळालेले नाही. या सिनेमात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. गरज असलेलेच संवाद सिनेमात दाखविण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन होईल असा कोणताच संवाद नसल्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी सांगतिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@