गोड बातमी... साखर उद्योगाला ४५०० कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी आली आहे. साखर उद्योगासाठी केंद्रीय मंत्रालयाने ४५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे साखर उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करण्यात येईल. साखर निर्यातीसाठी साखर कारखानदारांना अनुदानसुद्धा देण्यात येणार आहे. २०१८-१९ या वर्षासाठी ५० लाख टन साखर निर्यातीवर कारखानदारांना अनुदान देण्यात येणार आहे. १३.८८ रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबाने हे अनुदान देण्यात येईल. यामुळे देशातील साखरेचे भाव वाढून याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

 

साखर उद्योगासाठीचे हे दुसरे मोठे पॅकेज आहे. यापूर्वी जून २०१८ मध्ये ८५०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. यामुळे देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले होते. बंदरापासून १०० किमीच्या आत अंतर असेल, तर १००० रुपये अनुदान दिले जाईल. आणि त्यापेक्षा जास्त अंतर असल्यास २५०० अनुदान दिले जाईल. ज्या राज्यांना समुद्रकिनारा नाही, त्यांना ३००० रुपये वाहतूक अनुदान मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@