पहिल्या २४ तासात आयुष्मानचे १ हजार लाभार्थीं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |


 


लवकरच निघणार १ लाख आयुष्मान मित्रांची भरती

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेली, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-आयुष्मान भारत योजनेचा पहिल्या २४ तासात १ हजार लाभार्थींनी लाभ घेतला. २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी या योजनेची झारखंडची राजधानी रांची येथून सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी ५ लाभार्थीना 'गोल्ड कार्ड'चे वाटप केले होते. दरम्यान, छत्तीसगड, हरयाणा, आसाम, मध्यप्रदेश, झारखंड या राज्यातील लाभार्थींनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.

 

पूनम महतो ठरली पहिली लाभार्थी

 

आयुष्मान भारत योजनेच्या उदघाटनानंतर जमशेदपूरच्या सिंहभूम येथील सदर हॉस्पिटलमध्ये पूनम महतो ही महिला पहिली लाभार्थी ठरली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या या मुलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तसेच योजना लागू झाल्यानंतर रांची येथील इंस्टि्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (रिम्स) देखील चार रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला.

 

काय आहे योजना

 
 

आयुष्मान भारत योजनेंतर्गत १० कोटींहून अधिक कुटुंबातील ५० कोटी लाभार्थीना या योजनाचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीला ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे. ही योजना ३० राज्यातील ४४५ हून अधिक जिल्ह्यात एकाचवेळी सुरू करण्यात आली असून सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी २.६५ लाख बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या ९८ टक्के लाभार्थींची यादी तयार झाली आहे.

 

१ लाख आयुष्मान मित्रांची भरती

 

आयुष्मान भारत योजनेंतर्गत रोजगार निर्मितीदेखील होणार आहे. लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारतर्फे १ लाख आयुष्मान मित्रांची भरती केली जाणार आहे. हे आयुष्मान मित्र लाभार्थी आणि हॉस्पिटलदरम्यान समन्वय साधण्यास मदत करतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@