अयोध्या मुस्लिमांच्या तीन खलिफांचे कब्रस्तान नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |



सय्यद वसिम रिझवी यांचा मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांवर वार


लखनौ : भारतातील मूलतत्त्ववादी मुस्लिम पाकिस्तानी झेंड्याला इस्लामचा झेंडा समजतात आणि पाकिस्तानवर प्रेम करण्याला आपले इमान मानतात. अशा मानसिकतेचे लोकच अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर हक्क सांगत आहेत. अयोध्या प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान आहे, मुस्लिमांच्या तीन खलिफांचे कब्रस्तान नाही, अशा शब्दांत शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसिम रिझवी यांनी देशातील मूलतत्त्ववाद्यांवर दुगाण्या झाडल्या.

 

काँग्रेसशी हातमिळवणी करत वहाबी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाकिस्तानकडून पैसे घेतले आणि अयोध्या प्रकरण चिघळवले, असा आरोप करत रिझवी म्हणाले की, भारतात श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या बळींच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम मूलतत्त्ववादी पाकिस्तानकडे बक्षिसी मागतात. अयोध्येत प्रभू श्रीरामाचेच मंदिर उभारले पाहिजे आणि त्यासंदर्भाथला निर्णय लवकरात लवकर व्हायला हवा. श्रीराम भक्तच नव्हे तर खुद्द प्रभू श्रीरामही या संपूर्ण वादामुळे हताश झाले असल्याचे मला वाटते, असेही रिझवी म्हणाले.

 

अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीला गेले असून ही जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे, यावरील निर्णय अजूनही बाकी आहे.

 

स्वप्नात तंबूतले रामलल्ला रडताना दिसले

 

अयोध्येत आपल्या जन्मस्थानी अजूनही मंदिराची उभारणी केली नसल्याने स्वप्नात आलेले तंबूतले रामलल्ला रडत होते. सोमवारी रात्री मला पडलेल्या स्वप्नात प्रत्यक्षात प्रभू श्रीराम आले. त्यावेळी ते दुःखी झाल्याचे आणि रडत असल्याचे दिसले.

 

- सय्य्द वसिम रिझवी

अध्यक्ष, शिया सेंट्रल वक्फ बोर्ड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@