‘या’ टॉपर विद्यार्थीनीने लग्नानंतर १८ वर्षांनी घेतले शिक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |

 

 

 
 
 
मेरठ : लग्नानंतर संसाराची जबाबदारी आल्याने तिला पुढे शिकता आले नाही. संसारात तिने मन रमवले खरे पण शिकण्याची जिद्द मात्र सोडली नव्हती. म्हणूनच तर लग्नाच्या १८ वर्षांनंतरही तिला शिक्षण पूर्ण करता आले. ही गृहिणी केवळ पास झाली नाही तर ती उत्तर प्रदेशातील 'चौधरी चरण सिंग' या विद्यापीठाची टॉपर ठरली. आकांशा गुप्ता असे या गृहिणीचे नाव आहे.
 

आकांशा दोन मुलांची आई आहे. तिची मोठी मुलगी इयत्ता १२ वीत शिकत असून तिचा लहान मुलगा इयत्ता ९ वी मध्ये आहे. २००० साली तिचे अजित सिंह यांच्याशी लग्न झाले होते. त्यावेळी नुकतेच तिचे बीएचे शिक्षण पूर्ण झाले होते. परंतु पुढे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. पुढे २०१४ साली तिने तिच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन आकांशाने तिची पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. कुटुंबियांकडून परवानगी मिळाल्यानंतर तिने बीएडचे शिक्षण घेतले. बीएडमध्ये फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर तिने एमएचे शिक्षणही पूर्ण केले. मुलांना शाळेत सोडल्यानंतर ती कॉलेजला जायची. रात्री घरातील कामे संपल्यावर तिला अभ्यासासाठी वेळ मिळायचा. सध्या आकांशा नेट परिक्षेचा अभ्यास करत आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते आकांशा गुप्ताचा सत्कार करण्यात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@