‘सर्जिकल स्ट्राईक’ करणारा जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |

 

 

 
 
 
श्रीनगर : पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी असलेले जवान लान्स नायक संदीप सिंह शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या एका चकमकी दरम्यान त्यांना वीरमरण आले. तंगधार परिसरात दहशतवादी घुसखोरी करत असताना त्यांना रोखण्याचे काम करणाऱ्या तुकडीत संदीप होते. संदीप यांच्या पाश्चात त्यांची पत्नी व त्यांचा ५ वर्षांचा मुलगा आहे.
 

शहीद होण्यापूर्वी संदीप सिंह यांनी २ घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. परंतु पुढील चकमकीत त्यांना वीरगती प्राप्त झाली. देशासाठी बलिदान देणारे संदीप सिंह हे जवानांसाठी आदर्श होते. ते ४ पारा स्पेशल फोर्स युनिटचे सदस्य होते. संदीप सिंह शहीद झाल्याने देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@