'१०वी पास' मराठमोळ्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |



पिंपरी: पुण्यामधील पिंपरीमध्ये गॅरेज चालक असणाऱ्या प्रदीप मोहिते यांनी चक्क हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. एखाद्या वैमानिक आणि उच्चं शिक्षित असणाऱ्यांना तसे काही अवघड नसते. पण प्रदीप मोहिते हे फक्त दहावी पास आहेत. पिंपरीमधील एका गॅरेजमध्ये काम करणाऱ्या या तरुणाने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांना लहानपणापासूनच मोटार आणि इंजिन्समध्ये रस होता. त्यांच्या या कतृत्वाने सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गॅरेजमध्ये काबाड कष्ट घेत प्रदीप यांनी हेलिकॉप्टरची निर्मिती केली.

 

मुळचे सांगलीचे असणारे प्रदीप मोहिते हे सध्या पिंपरी शहरात राहतात. पिंपरीमध्ये त्यांचे श्री सिद्धनाथ नावाचे स्वतःचे गॅरेज आहे. प्रदीप यांना लहापणी हेलिकॉप्टरविषयी आवड होती. लहान असताना त्यांना कागदी आणि लाकडाचे हेलिकॉप्टर बनायला आवडायचे. त्यांचे हेच स्वप्न त्यांनी मोठे होऊन पूर्ण करून दाखवले. त्यांनी एक नाही तर चक्क सात हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे.
 

प्रदीप यांनी सहा वर्षांपूर्वी गॅरेजमधील उपकरणांची जुळवाजुळव करून पहिले हेलिकॉप्टर बनवले होते. पण त्यावेळी त्यांची म्हणावी तशी दाखल घेतली गेली नव्हती. त्यानंतर आपले सगळे कौशल्य पणाला लावून त्यांनी सात प्रकारची हेलिकॉप्टर तयार केली आहेत. ज्याची दखल थेट हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ह्या संस्थेने घेतली आहे. या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी तर घेतली आणि त्यांनी तयार केलेल्या हेलिकॉप्टरच्या पाच पार्टसच पेटंटही मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांना याची प्रेरणा त्यांना २००९ साली आलेल्या थ्री इडियट्स या सिनेमाकडून मिळाली असल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@