डोनाल्ड ट्रम्प देखील म्हणाले 'आय लव्ह इंडिया!'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |



नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं भारतावर प्रेम असल्याचं आणि मोदी आपले चांगले मित्र असल्याचे जाहीर केले. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधी परिषदेच्या वेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संवाद साधताना खुलासा केला.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी ७३ व्या अमली पदार्थ विरोधी परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वराज या अमेरिकेला गेल्या आहेत. त्यावेळी त्यांनी ट्रम्प आणि अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राच्या राजदूत निक्की हेली यांची भेट घेतली. त्यावेळी निक्की हेली यांनी स्वराज यांची गळाभेट घेत स्वागत केले. या भेटी दरम्यान "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत", असे स्वराज म्हणाल्या. त्यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान आणि भारताची स्तुती करत "माझं भारतावर प्रेम आहे आणि मोदी माझे मित्र आहेत" असे म्हणाले.

 

Global Call to Action on the World Drug Problem ही परिषद अमेरिकेमध्ये पार पडत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य देशांनी यात भाग घेतला आहे. यात भारताचा देखील समावेश असून डोनाल्ड ट्रम्प या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@