पाणघोड्याचा पिंजरा अखेर पर्यटकांसाठी खुला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |


 
 

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) पाणघोड्याच्या पिंजऱ्यात दोन आठवड्यांपूर्वी गोंडस पिल्लाचा जन्म झाला होता. परंतु, प्रशासनाने त्याबाबत मौन बाळगले होते. तसेच हा पिंजरा बॅरिकेड्स लावून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु, दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये याबाबतचे वृत्त दि. १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने हा पिंजरा गुरुवारपासून पर्यटकांसाठी अखेरीस खुला केला. त्यामुळे सध्या या पाणघोड्याच्या पिल्लाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.

 

दोन वर्षांपूर्वी राणीच्या बागेत अशाच एका पाणघोड्याच्या पिल्लाचा जन्म झाला होता. मात्र, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे पिल्लू धनुर्वाताने त्रस्त झाले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पिल्लाला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे या पिल्लाचा मृत्यू झाला. तसेच हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूनंतर पाणघोड्याच्या पिल्लाबाबत प्रशासनाने मौन बाळगले होतेदोन आठवड्यांपूर्वी पाणघोड्यांच्या पिंजऱ्यात नव्या पिल्लाचा जन्म झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातील सूत्रांनी दिली होती. परंतु, “पाणघोड्याला पिल्लू झाल्याची माहिती खोटी आहे.

 

पाणघोड्याच्या पिंजऱ्याची सध्या दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे हा परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. या परिसरात पर्यटकांनाही मनाई आहे,” असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले होते. मात्र, पाणघोड्याच्या पिल्लाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राणीच्या बागेतील वरिष्ठ अधिकार्यांनी हा पिंजरा खुला करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार हा पिंजरा खुला करण्यात आला.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@