ते ३५ विद्यार्थी सुरक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2018
Total Views |

 

 

 
 
 
लाहौल : हिमाचल प्रदेशात लाहौल आणि सिप्ती येथे ट्रेकिंगसाठी गेलेले ३५ विद्यार्थी बेपत्ता झाले होते. हे विद्यार्थी आयआयटीचे असून ते सुरक्षित असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली. हे विद्यार्थी रुकरी येथील आयआयटीचे आहेत. त्यांच्यासोबत इतरही जण ट्रेकिंगला गेले होते. ३५ विद्यार्थ्यांसह इतर १० जण असे एकूण ४५ जण बेपत्ता होते.
 

हिमाचल प्रदेशातील हवामान सध्या खराब असून तेथे सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. कुल्लू, कांगरा आणि चम्बा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण ५ जणांची मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी भूस्खलनदेखील झाले आहे. सोमवारी तेथील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. कांगरा, कुल्लू आणि हमीरपूर जिल्ह्यात सुरक्षेसाठी आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@