अभिलाष टॉमी यांना वाचवण्यात यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांना वाचवण्यात यश आले आहे. आज फ्रान्सच्या जहाजांची मदत घेऊन अभिलाष यांना वाचवण्यात आले. अभिलाष हे शुद्धीत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना पुढील उपचारासाठी आईएनएस सातपुरा मधून मॉरिशसमध्ये नेले जाणार आहे. अशी माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर दिली. अभिलाष हे गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान दक्षिण हिंद महासागरात असलेल्या लांटांमुळे व वादळामुळे २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या संपर्क तुटला होता. तीन दिवसानंतर शोध पथकाच्या अथक परिश्रमानंतर अभिलाष यांना वाचवण्यात यश आले आहे.
 
 
 
 

कोण आहेत कमांडर अभिलाष टॉमी?

 

अभिलाष टॉमी हे भारतीय नौदलात कमांडर आहेत. २००० साली ते भारतीय नौदलात भरती झाले होते. फ्रान्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत ८४ दिवसांत १०,५०० सागरी मैलांचा प्रवास केला होता. यापूर्वी देखील त्यांनी २०१३ साली समुद्रमार्गे पृथ्वीप्रदक्षिणा केली होती. १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या १५१ दिवसात कमांडर अभिलाष यांनी ही २३,१०० नॉटिकल मैलांची जगप्रदक्षिणा पूर्ण केली होती. यासोबतच ते साहसी सागरी मोहिमांसाठी आणि प्रेरणादायी व्याखाने देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

 

 
 

काय आहे गोल्डन ग्लोब रेस-२०१८?

 

गोल्डन ग्लोब रेस ही आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धा आहे. अत्यंत कठीण असलेली ही स्पर्धा खलाशांची प्रतिष्ठेची मनाली जाते. या स्पर्धेत संपूर्ण पृथ्वीला जल मार्गाने आणि कोणत्याही मदतीशिवाय एकट्याने प्रदक्षणा घालावी लागते. १ जुलै पासून फ्रान्सच्या ला सेब्ला दोलॉन येथून यावर्षीच्या स्पर्धेला सुरुवात झाली होती. यात जगभरातील १८ खलाशी सहभागी झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@