'...तर मला शिवाजी महाराजांच्या जीवनात चित्रपट बनवायला आवडेल' - रोहित शेट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |



मुंबई: उडत्या गाड्या, धमाल कॉमेडी आणि पैसे वसूल मनोरंजन याच समीकरण करणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल सिरीज हे सगळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणावे हे एकमेव लक्ष असल्याचे तो सांगतो. सध्या बॉलीवूडचा बायोपिक ट्रेण्ड सर्चार्चीत आहे. नुकतेच आलेले 'संजू', 'सुरमा', 'गोल्ड' ही ताजी उदाहरणे आहेत.

 

रोहित शेट्टीला ही एखादा बायोपिक साकारायची आहे का असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर रोहितने मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायला आवडेल अशी इच्छा त्याने व्यक्त केली. ' मी जर बायोपिकचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करेन. त्यांच्याबद्दल मी बरेच वाचले आहे. पण या सिनेमासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतील.' असे त्याने सांगितले. आता जरा त्याने हा सिनेमा बनवायचे ठरवले तर यामध्ये मुख्य भूमिका कोण साकारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@