सिक्कीम राज्यात पहिल्या विमातळाचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |


 

 
 

गंगटोक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिक्कीम राज्यात सोमवारी पहिल्या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले आहे. २००९ साली या विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर ९ वर्षांनी सिक्कीमवासियांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. राज्याची राजधानी असलेल्या गंगटोकपासून हे विमानतळ ३५ किमी दूर आहे. पाकयोंग येथे हे विमानतळ उभारण्यात आले असून येत्या ४ ऑक्टोबरला पहिले व्यावसायिक विमान उड्डाण करणार आहे. देशातील १००वे आणि सिक्कीममधील पहिले विमान उड्डाण घेताच हे राज्य देशातील मुख्य प्रवाहाशी जोडले जाईल.

 

भारत-चीन सीमेपासून हे विमानतळ ६० किमी अंतरावर आहे. हे विमानतळ २०० एकरावर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर असलेलं हे विमानतळ पाकयोंग गावापासून २ किमी उंच डोंगरावर आहे, अशी माहिती सिक्कीमचे मुख्य सचिव ए.के.श्रीवास्तव यांनी दिली आहे.

 
 
 

थकवणाऱ्या या प्रवासाचे अंतर या विमानसेवेमुळे काही मिनिटांवर येणार आहे. इथून प्रवास करणे सामान्य माणसांच्या आवाक्यातले असेल, असा साकारणे प्रयत्न केला आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरु राहील. याचाच परिणाम म्हणजे सिक्कीमसहित मेघालय, मणिपूर नागालँड, आसाम , अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या सर्व राज्यामध्ये अनेक कामे पहिल्यांदाच होत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. सिक्कीमधले विमानतळ हे देशामध्ये १००वे विमानतळ आहे. यापैकी ३५ विमानतळ हे गेल्या चार वर्षात बनवले आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात २०१४ पर्यंत केवळ ६५ विमानतळ होते. गेल्या चार वर्षात सरासरी एका वर्षांमध्ये ९ विमानतळ सुरु करण्यात आले, असेही मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@