डी.जे. वाजवल्याने ५२ गणेशमंडळांवर कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |


 

 

पुणे: राज्यात डीजे आणि डॉल्बीला कोर्टाने बंदी घालून सुद्धा पुण्यामध्ये सर्रास मंडळांनी त्याचा वापर केला. मुंबई हायकोर्टाने डी.जे. आणि डॉल्बी वर बंदी घातली होती. मात्र काही मंडळांचा कोर्टाच्या या निर्णयाला विरोध होता. काही मंडळांनी आदेशाचे पालन न करता डी.जे. आणि डॉल्बीचा वापर केला गेला. पोलिसांनी विसर्जनादिवशी त्यांची नोंद करून घेतली तर काही ठिकाणी त्याच वेळेस कारवाई करण्यात आली.

 

दुसऱ्यादिवशी पोलिसांनी लगेच नोंद झालेल्या मंडळांवर कारवाई केली गेली. यामध्ये आतापर्यंत पुण्यामधील ५२ मंडळांचा समावेश आहे. पुण्याचे कमिश्नर व्यंकटेश यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, यावर्षी डी.जे. आणि डॉल्बी संदर्भात कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याने आतापर्यंत ५२ गणेश मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@