होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2018
Total Views |



औषध सिद्धतेच्या प्रक्रियेबद्दल आपण विस्ताराने जाणून घेत आहोत. औषध सिद्धतेच्या प्रयोगादरम्यान होमियोपॅथिक डॉक्टर फार महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. ते स्वतः सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन असतात व बऱ्याच प्रयोगांत स्वत:ही भाग घेतात. अशावेळी त्यांना जाणवणारी लक्षणे व चिन्हे ते अतिशय उत्तमरित्या नोंदवून ठेऊ शकतात.

 

ही औषध सिद्धता करताना औषधे व सिद्धकर्ता यांच्या बाबतीत काही काळजी घ्यावी लागते व काही पथ्ये पाळावी लागतात.
 

1) औषधाविषयीची सावधानता -

 

) जी औषधे सिद्ध करायची असतात, ती पूर्णत: माहितीची असली पहिजेत. याशिवाय या औषधाची शुद्धतासुद्धा नीट पडताळून पाहिली. याशिवाय तिचा खरेपणा genuineness पडताळवा लागतो.

 

) औषध सिद्धतेची औषधे ही साध्या स्वरूपातच घेतली जावीत. तसेच या औषधांमध्ये कुठलेही दुसरे औषध मिसळलेले असता कामा नये आणि इतर कुठलीही भेसळ या औषधामध्ये असता कामा नये. या सर्व गोष्टींची तपासणी करूनच ही औषधे वापरली जावीत.

 
) एका वेळ सिद्धकर्त्याता एकच औषध सिद्धतेसाठी दिले जाते. कारण, अनेक औषधे दिल्यास प्रत्येक औषधाची लक्षणे शोधणे ही अवघड होऊन बसते.
 

) बहुतांश औषधे ही अतिशय सूक्ष्म शक्तीमध्ये द्यावीत व त्यांची मात्रासुद्धा कमी असावी. अशाने औषध सिद्धता व्यवस्थित पार पडते. जर औषधे जास्त शक्तीमध्ये व जास्त मात्रेत दिली गेली, तर कदाचित सिद्धकर्त्याच्या शरीरावर व पेशींवर त्यांचा विपरीत परिणाम होण्याची शक्तता असते.

 

) होमियोपॅथीची औषधे सिद्ध करताना त्याच त्याच मात्रा सारख्या वापरू नयेत. कारण, सतत डोस देत राहिल्यामुळे लक्षणे व त्यांची तीव्रता समजण्यात व्यत्यय येऊ शकतो.

 

सिद्धकर्त्याने घ्यावयाची काळजी व सावधानता

 

) सिद्धकर्ता जेव्हा होमियोपॅथीचे औषध सिद्ध करत असतो तेव्हा इतर कुठलीही औषधे जर चालू असतील तर त्याला सिद्धता करता येत नाही. कारण औषध सिद्ध करताना शरीर व मन इतर कुठल्याही औषधाच्या अंमलाखाली असता कामा नये. कारण, असे असल्यास औषधाचे परिणाम नीट पारखता येत नाहीत.

 

) आहारातील पथ्ये : सिद्धकर्त्याला औषध सिद्ध करताना व त्यापूर्वी आपल्या आहारात काही बदल करावे लागतात. त्याचा आहार हा अतिशय पौष्टिक असावा लागतो. शिवाय सात्विक व साधा असावा लागतो.

 

आहारात अतिशय मसालेदार पदार्थ, चमचमीत पदार्थ वर्ज्य करावेत. साध्या भाज्या व फळे यांचा आहारात वापर करावा. ज्या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म मुख्यत्वे आपण पाहतो. उदा. तुळस असे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. हिरवे वाटाणे किंवा बटाटे यासारखे पदार्थ ज्यामध्ये औषधी गुणधर्म नसतात, असे पदार्थ सेवन करावेत. सिद्धकर्त्याने त्याच्या आहारातून मद्याचे प्रकार जसे वाईन, ब्रॅण्डी आदी सर्व प्रकार बंद करावेत. याशिवाय चहा व कॉफीसारखी उत्तेजक पेयसुद्धा काही काळापुरती पूर्ण बंद करावीत. औषध सिद्धता करण्याच्या बरेच दिवस आधीपासूनच ही सर्व पथ्ये पाळावी लागतात, तेव्हाच आपले शरीर हे सिद्धतेसाठी तयार होते. याचबरोबर मनाची शांतता हेसुद्धा महत्त्वाचे कलम आहे. सिद्धकर्त्याने कुठल्याही प्रकारची मानसिक व शारीरिक धावपळ करू नये. कुठल्याही प्रकारची इतर महत्त्वाची कामे मागे ठेऊ नयेत, जेणेकरून औषध सिद्धतेवर लक्ष केंद्रीत करता येईल. मन जास्तीत जास्त शांत व सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे नियम पाळून केलेली औषध सिद्धता ही अतिशय सफल होते.

 

-डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@