आयुष्मान भारत योजनेला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2018
Total Views |



 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रांचीमधून आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत देशातील १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना संपूर्ण मोफत आरोग्य विमा मिळेल. पंतप्रधानांनी रांची येथील प्रभात तारा मैदानात या योजनेची घोषणा केली. देशातील गरीब जनतेच्या सेवेसाठी मिळालेली आम्हाला संधी आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केली. सुमारे ५० कोटी जनतेला सरकारी उपचारासाठीची ही योजना देशातील जगातील सर्वात मोठी योजना आहे. येत्या काळात जगभरातील आरोग्य सेवेत काम करणारे लोकांना या योजनेचा अभ्यास करावा लागेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

 
गेले सहा महिने आयुष्मान भारतची टीम ध्येय समोर ठेवून काम करत आहे. त्यांचे हे काम कौतूकास्पद आहे. त्यांचे मनपूर्वक आभार, ही टीम येत्या काळात आणखी जोमाने काम करेल, अशी माझी अपेक्षा आहे. देशातील तमाम जनतेचे आशीर्वाद त्यांच्या मागे असल्याने ते यात यशस्वी होतील, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेसाठी २३ राज्यांनी संमती दर्शविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे अनावरण करण्यात आले. यात राज्याने सहभाग दर्शविला असून राज्यातील २०११च्या जनगणनेतील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नांच्या नोंदीवरून सुमारे ८४ लाख कुटुंबांची निवड केली. पहिल्या टप्प्यामध्ये राज्ये व पालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये खासगी रुग्णालयांना यात सहभागी करण्यात येणार आहे. योजनेसाठीचा केंद्राकडून ६० टक्के तर ४० टक्के राज्याकडून आर्थिक वाटा उचलण्यात येणार आहे. राज्यात सद्य:स्थितीला सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह ही योजना सुरू राहील, अशी माहिती संबधित सुत्रांनी दिली. आयुष्मान योजनेतील समाजातील सर्वसामान्य स्तरातील सर्वांना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/  
@@AUTHORINFO_V1@@