गोव्याची धुरा पर्रीकरांकडेच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2018
Total Views |


 

 
 
नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यपत्री म्हणून मनोहर पर्रिकरच हि धुरा सांभाळतील अशी माहिती अमित शाह यांनी ट्विटरवरून दिली आहे. गोवा प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा केल्यानंतर राज्याचे नेतृत्व पर्रीकरांकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य मंत्रिमंडळामध्येही लवकरच फेरबदल करण्यात येतील अशीही माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.
 
 
 
 

गेले काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे भाजप सोबत सत्तेत असलेल्या सहकारी पक्षांकडून मुख्यमंत्री पदासाठी फेरबदलाची मागणी करत होते. परंतु शाह यांनी मनोहर पर्रिकरच मुख्यमंत्री पदावर राहतील असे स्पष्ट केल्याने चर्च्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@