राफेल करार रद्द होणार नाही : जेटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2018
Total Views |
  

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीवरुन सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आता अर्थमंत्री अरुण जेटलींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. टीका करताना शब्दांचा वापर जपून करा, असा सल्ला जेटलींनी राहुल यांना दिला आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटल्यानुसार, काँग्रेसचे सर्व आरोप बिनबुडाचे असून राफेल करार रद्द होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

 

मोदी सरकारकडून राफेल करारासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सचे नाव सुचवण्यात आले होते, असे विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केले. यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. राहुल यांनी केलेल्या टीकेचा अरुण जेटलींनी चांगलाच समाचार घेतला. 'सार्वजनिक सभा लाफ्टर चॅलेंज नसतात. लोकशाहीत तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी शब्दांची निवड काळजीपूर्वक करायला हवी,' अशा शब्दांत जेटलींनी राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@