पुण्यातील राहुल पार्क सोसायटीचा आदर्श गणेशोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |


 

 

पुणे : वारजे येथील राहुल पार्क सोसायटीमध्ये यावर्षी अनोख्या प्रकारचा आणि आदर्श असा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी गणपतीच्या मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत सर्व इको फ्रेंडली गोष्टींवर भर देण्यात आला होता. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत यंदा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सोसायटी लहानापासून ते वृद्धांपर्यंत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचा गोंगाट व कर्कश आवाज न करता कार्यक्रम पार पाडला.
 

सांस्कृतिक कार्यक्रमात चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत येणारे मराठी सण आणि परंपरा यांचे प्रदर्शन करण्यात आले होते. छोट्या गटातील मुलींनी भोंडला, शिवस्तुती आणि लग्नसराईचे अप्रतिम नृत्य सादर केले. पुरुष मंडळींनी लेझीम नृत्य, तरुण मुलांनी दहीहंडी आणि होळीचे नृत्य सादर केले. तर आषाढी वारीचे नृत्य, जोगवा, कोळी, मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, दीप नृत्य सादर केले. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांना पोवाड्याची मानवंदना देऊन करण्यात आला.

 

 
या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन शिल्पा महाजनी यांचे होते तर नृत्य दिग्दर्शन तेजस्विनी शेटे यांनी केले. भारती पाटील यांनी मंगळागौरीचे खेळ दिग्दर्शित केले होते. यासाठी सोसायटीच्या पदाधिकारी आणि कल्चरल कमिटीने या कार्यक्रमासाठी मोलाची साथ दिली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@