चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |


 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या एका संशयित इसमाला अटक केली आहे. त्साओ लुंग (वय ३९) असे या संशयित गुप्तहेराचे नाव असून त्याच्याकडून आधार कार्ड आणि भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. चार्ली पेंग या भारतीय नावावर तो राहत होता. दिल्लीतील मजनू की टीलाया भागात ही कारवाई करण्यात आली. गेल्या सहा वर्षोपासून हा इसम भारतीय पासपोर्टवर भारतात राहत होता. त्याच्यावर फसवणूक आणि पासपोर्ट अधिनियम आणि विदेशी अधिनियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 

पूर्वोत्तर राज्य आणि हिमाचल प्रदेशमधील संशयास्पद हालचालींमुळे तो भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आला. त्साओ लुंगला भारतीय पासपोर्ट मणिपूरमधून देण्यात आला होता. तर त्याच्या आधार कार्डवर दिल्लीमधील पत्त्ता आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने भारतीय महिलेशी लग्न केले असून तो भारतात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या संशयित इसमाला दिल्ली न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@