‘व्हिलेज रॉकस्टार’ निघाली ऑस्करला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |


 

 
 

मुंबई : यंदाच्या ऑस्करसाठी ‘व्हिलेज रॉकस्टार’ या आसामी सिनेमाला नामांकन मिळाले आहे. 'पद्मावत', 'पिहू' 'कडवी हवा', 'न्यूड' या सिनेमांना टक्कर देत व्हिलेज रॉकस्टार या सिनेमाने हे नामांकन मिळविले आहे. भारतातर्फे या सिनेमाचा ‘सर्वोत्कृष्ट विदेशी सिनेमा’ या श्रेणीत समावेश केला जाणार आहे. असे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले. रीमा दास दिग्दर्शित या सिनेमाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या सिनेमातील बालकलाकार भनिता दास हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

आसाममधील एका छोट्याशा गावातील एका लहान मुलीची ही कथा आहे. संगीताची तिला आवड असते. गावातल्या मुलांसोबत झाडावर चढणाऱ्या, त्यांच्यासोबत नेहमी मजामस्ती करणाऱ्या, खेळणाऱ्या लहानगीची भूमिका भनिता दासने साकारली आहे. गावातल्या तिच्या या मित्रांसोबत मिळून ती एक छोटेखानी म्युझिक बँड काढते. एक मुलगी म्हणून तिला येणाऱ्या अडचणी आणि आसाममधील वास्तव यावर या सिनेमाच्या माध्यामातून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आहे.

 
 
 

 

७० हून अधिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला. ४ राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर ४४ पुरस्कार या सिनेमाला आतापर्यंत मिळाले आहेत. दिग्दर्शिका रिमा दास यांनी ट्विटरच्या माध्यामातून आपला आनंद व्यक्त केला. तसेच व्हिलेज रॉकस्टार या सिनेमाला ऑस्कर नामांकन मिळाल्याबद्दल त्यांना खूप अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या. २८ सप्टेंबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होईल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@