चांदी ठरणार सापाच्या विषावर रामबाण उपाय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |


 
 

 

मुंबई : सर्पदंश झाल्यास त्या सापाचे विष उतरवण्यासाठी एक रामबाण उपाय शोधून काढण्यात आला आहे. सापाचे विष उतरविण्यासाठी चांदीचे कम आता उपयोगी पडणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या जीवभौतिक शास्त्र विभागाने हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी चांदीच्या धातूचे सूक्ष्म कण तपासण्यात आले. चांदीच्या या सूक्ष्म कणांमुळे सापाच्या विषाची तीव्रता ९५-९८ टक्के कमी झाल्याचे आढळून आले. या संशोधनामुळे देशातील कोट्यावधी जनतेला फायदा होणार आहे. अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जीवभौतिक शास्त्राचे प्रमुख प्राध्यापक प्रभाकर डोंगरे यांनी दिली. 
 

जपानमधील जीवभौतिक शास्त्र आणि टॅक्सिकॉन या संशोधन नियतकालिकांमध्ये मुंबई विद्यापीठाचे हे संशोधन प्रसिद्ध होणार आहे. वृषाली हिंगणे आणि धनश्री पंगम या दोन विद्यार्थिनींची या संशोधनात प्रा. डोंगरे यांना मदत होत आहे. सर्पदंश व त्यावरील उपचार यावर आजवर फार संशोधन झालेले नाही. दरवर्षी भारतात सर्पदंशामुळे सुमारे ५२ हजार मृत्यु होतात. मुंबई विद्यापीठाच्या या संशोधनामुळे सर्पदंशावर आता ठोस उपाचार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@