५१ देशांच्या चलनांची मांडणी करून साकारली श्री गणेशाची आरास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |

जिज्ञासू भाविकांना दर्शनाची संधी; चलन १ लाखापर्यंत

 
 
जळगाव :
शहरातील मूळ रहिवासी निलेश पाटे यांनी वयाच्या १४व्या वर्षापासून संग्रहित केलेल्या ५१ देशांच्या परकीय चलनातून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे. त्या सर्व परकीय चलनाची किंमत जवळपास १ लाख रुपयांपर्यंत आहे.
 
 
निलेश पाटे हे शहरातील महाबळ कॉलनीतील रहिवासी. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग व एमबीए केले असून त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण व इंजिनिअरिंगचे शिक्षण जळगावातच झाले आहे. ते सध्या दुबई येथील डायमंड ज्वेलरीच्या अग्रगण्य कंपनीत सिनिअर मॅनेजरपदी कार्यरत आहेत.
 
 
त्यांना परकीय चलन जमविण्याचा छंद लहानपणापासूनच आहे. त्यांना परकीय चलन जमविण्याचा छंद लहानपणापासून आहे. यासाठी त्यांनी चार-पाच वेळा अजिंठा लेणी येथे जाऊन पर्यटकांना भेटून विविध देशांचे परकीय चलन व नाणी जमा करून ठेवले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 
 
त्यांनी प्रामुख्याने इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, यूएई, कुवेत, कतार, ओमान, जर्मनी, सिंगापूर, हॉंगकॉंग, मकाऊ व सर्व युरोपीय देश, नेपाळ, भूतान अशा जवळपास ५१ देशांचे चलन संग्रहित करून त्यातून श्री गणेशाची मूर्ती रेखाटण्याची कल्पना सुचली. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी आपली जमविलेली नाणी व परकीय चलनातील नोटा खराब होऊ नयेत, म्हणून सर्व नोटांना लॅमिनेशन केले आहे. त्यानंतर त्यांनी श्रीगणेशाचे चित्र स्वतः रेखाटले. ४ फूट रुंद व ५ फूट उंच अशी श्रीगणेशाची आरास त्यांनी तयार केली. सर्व चलन त्यांनी कार्ड-बोर्डवर चिकटवले. स्वतः श्री गणेश मूर्तीच्या आरासीचे रेखाटन केले. त्यांना ह्या सर्व आरास रेखाटनासाठी १६ ते १७ तास लागल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मूर्तीची आरास रेखाटल्याने मी खूप आनंदी आहे. भविष्यात ही आरास माझ्या संग्रहात अशीच ठेवण्याचा मानस त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला. आरास ३ अ, महाबळ कॉलनी, पीपल्स बँकेच्या मागील बाजूस, जळगाव येथे पाहता येईल, असे निलेश पाटे यांनी सांगितले.
 
                                                   https://www.facebook.com/Tarunbharatjal/
@@AUTHORINFO_V1@@