पनवेलमध्ये कर्मवीरांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |



पनवेल: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांची १३१ वी जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या प्राणभूत तत्त्वांचा श्रद्धेने स्वीकार करत ही तत्त्वे प्रत्यक्षात्त आचरणात आणली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागमय कार्याला परंपरेने मिळालेला वारसा आहे. शाहू महाराजांच्या कार्याचा, समाजसुधारणेचा ठसा अण्णांच्या मनावर उमटला. त्यांनी आपल्या आयुष्यात ग्रामीण शैक्षणिक कार्याचा प्रचंड वटवृक्ष उभा केला.

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेमधून तसेच शाहू बोर्डिंगमधून स्वतंत्र विचारांची एक पिढी निर्माण झाली. ही पिढी अत्यंत स्वावलंबी आहे. रयत शिक्षण संस्था व शाहू बोर्डिंगने अनेकांना विद्याविभूषित निर्माण केले. त्यातील शिक्षण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण तसेच प्रशासकीय क्षेत्रात अनेकजण अत्यंत यशस्वी झाले आहेत. त्या शिकवणीतून यशस्वी झालेले रयतचे मॅनेजींग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासह सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती दर्शना भोईर आणि अन्य मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने पनवेल शहर पसिरामध्ये ‘कर्मवीर रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@