थोरली पाती, पैचान कौन?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018   
Total Views |

 


 
 
 
मुँह मे आया बक दिया...’ ही एका माणसाची विशेषता आहे. ‘नित्य उठावे, हरी नाम घ्यावे’ या उक्तीप्रमाणे नित्य उठावे अन् संघ-भाजपला शिव्याशाप द्यावे, अशी दैनंदिनी एका माणसाने कायम ठेवली आहे. आता कुणाला वाटेल की, मी राजकुमार राहुल गांधी यांच्याविषयी बोलते की काय? तर हे वाटणे अर्धसत्य आहे. राजकुमार राहुल गांधी तर ‘मुँह मे आया बक दिया’ या विशेषतेमध्ये धाकली पाती आहेत. ‘मुँह मे आया बक दिया,’ या उक्तीला जिवाभावाने जपत महाराष्ट्रात जीवनक्रमण करणारा वंचित-शोषितांचा एकमेव स्वयंघोषित अजिम-ओ-शान-शहेनशाह आहे. त्याने राहुल गांधी या धाकली पातीला मागे सारत मोठी पाती हा किताब मिळवला आहे. अजिबात मनन, चिंतन सत्य याचा परामर्श न घेता ही व्यक्ती धांदात खोटी आणि विचित्र विधाने करत असते. भोळ्या समाजाला चिथवणे, इतिहासाची चिरफाड करत मन मानेल ती विधाने करणे यात या थोरली पातीचा हात कुणीही धरू शकत नाहीमागे थोरल्या पातीने नवी ‘पेशवाई-बिशवाई’ म्हणत ‘एल्गार’चा बार फोडला. त्यात समाज किती होरपळला, याचा हिशोब केला की कोण्याही समाजशील व्यक्तीला दुःख आणि संताप आल्याशिवाय राहत नाही. असा आपल्यासोबतचे कुणी केंद्रात मंत्री झाले, कुणी सत्तेची फळे चाखली. मात्र, आपण महाराष्ट्र नामक एका राज्यात संकुचित राहिलोय, हे शल्य त्यांच्या उरी होतेच. पण, ‘एल्गार’नंतर अचानक सर्वत्र चमकायला मिळायची आयतीच संधी थोरल्या पातीला मिळाली. मग काय, बोथट असलेल्या थोरल्या पातीला थोडी धार आली. ‘बदनाम होता है तो क्या नाम तो होता है,’ असा धूर्त विचार करून थोरली पाती मग बाजारात गर्म असलेल्या विषयाला हाताशी घेऊन दररोज संघ, भाजप, मनू, ब्राह्मण, आदिवासी, मूलनिवासी वगैरे शब्दांची जाळी विणू लागला. मात्र, कोळी जसा स्वतःच्याच जाळ्यात अडकतो, तसेच धाकल्या पातीचेही झाले आहे. त्यामुळेच सत्ता तर हवी. पण युती कुणाशी करावी? काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम यावरून थोरल्या पाती सैरभैर झाल्याचे दाखवत आहे. पण, हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. थोरली पाती धाकली पाती राजकुमार राहुलच्या चरणी विलीन होणार हे नक्की. ही थोरली पाती कोण आहे? पैचान कोण?
 

समाजही करेल ‘साईड ट्रॅक’

 

थोरली पात कोण, हे आतापर्यंत सूज्ञ वाचकांनी ओळखले असेलच. या थोरल्या पातीने ज्याच्याशी दोस्ती केली, तोही स्वतःला मुस्लिमांचा स्वयंघोषित अजिम-ओ-शान-शहेनशहा समजतो. या दोन स्वयंघोषित अजिम-ओ-शान-शहेनशहा म्हणे हिंदुस्तानचे तख्त जिंकायचे आहे. आता त्यासाठी धाकली पाती राजकुमार राहुलची ‘आय काँग्रेस’ म्हणे थोरल्या पातीला पसंत आहे. मात्र, राष्ट्रवादी पक्ष नापसंत आहे. कारण काय तर म्हणे, काँग्रेस निधर्मी आहे. राष्ट्रवादी निधर्मी नाही.(वर शरद पवार निधर्मी आहेत, अशी मखलाशीही थोरल्या पातीने केली आहे). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाज विसरला नाही. स्वातंत्र्यानंतर रझाकारांच्या कृत्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही समर्थन केले नसेल किंवा जर ते आता असते तर धार्मिक विद्वेष वाढविणाऱ्या आणि ५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा २५ कोटी- १०० कोटी काय करतील अशी दुष्ट, हिंसात्मक देश आणि समाजविद्रोही भाषा बोलणाऱ्या सध्याच्या एमआयएम पक्षालाही त्यांनी दारात उभे केले नसते. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला डावलण्याची एकही संधी सोडली नाही. बाबासाहेब हे मत्सर किंवा वैर मनात ठेवून वागणारे नव्हते. ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय’ असा मंत्र जपणाऱ्या डॉ. बाबासाहेबांना काँग्रेसचे वास्तव रूप माहिती होते म्हणूनच ते काँग्रेसला ‘जळकेघर’ म्हणाले. (डॉ. बाबासाहेब द्रष्टा होते. खरेच काँग्रेसच्या जळक्या घरामुळे देश विविध समस्यांनी होरपळला.) मात्र, महामानवाचे नाव आहे म्हणून आणि केवळ त्यामुळेच समाजात, देशात इज्जत मिळत असलेले प्रकाश आपल्या थोर आजोबांचे विचार विसरले आहेत. अर्थात, प्रकाश यांनी काँग्रेसला साथ दिली काय किंवा कोलांटउडी घेत भाजपलाही साथ दिली काय, त्यामुळे काही फरक पडत नाही. कारण, सत्तेसाठी वाट्टेल ती समीकरणे जुळवताना प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ देशप्रेमी आणि समाजशील विचारांना सरळसरळ साईड ट्रॅक दाखवला आहे. त्यामुळे प्रकाश ज्यांच्याशी युती करतील, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून मानणारा समाजही निश्चितपणे साईड ट्रॅक करेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@