जळगाव जि.प.मधील ४२ कर्मचार्‍यांच्या बदल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Sep-2018
Total Views |

 
जळगाव २१ सप्टेंबर
जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांपासून प्रदीर्घ काळ एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या ४२ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदलीचा आदेश जिल्हा परिषद प्रशासनातर्फे शुक्रवारी २१ रोजी बजावण्यात आला.
 
 
जिल्हा परिषदेत कित्येक वर्षांपासून अनेक कर्मचारी एकाच टेबलावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारी वरिष्ठ सहाय्यक लिपीक १८, कनिष्ठ सहायक्क लिपीक २२ तर २ कार्यालयीन अधीक्षकांच्या इतर विभागात बदल्या केल्या. ठाण मांडून बसलेल्या या कर्मचार्‍यांच्या त्वरित बदल्या करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील यांनी केली होती. तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच टेबलवरील कर्मचार्‍यांच्या बदलीचा निर्णय २४ सप्टेबरपर्यंत प्रशासनाने न घेतल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला होता.
 
 
जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेत अखेर पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच टेबलवरील गणपतींची इतरत्र बदली केली. त्यामुळे मनमानी करणार्‍या कर्मचार्‍यांना चाप बसला आहे. पुढेही असेच कठोर धोरण ठेवावे अशी चर्चा जि.प.त शुक्रवारी दिवसभर कर्मचार्‍यांमध्ये रंगली होती. दरम्यान, या कृतीने कर्मचार्‍यांमध्ये भीती दाटल्याचे दिसून आले.
@@AUTHORINFO_V1@@