'प्रहार' ठरणार शत्रूंचा कर्दनकाळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |


 

नवी दिल्ली : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच 'डीआरडीओ'ने प्रहार या बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ओडिशा येथील बालासोर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथून ही चाचणी घेण्यात आली. याबाबतची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली. गुरुवारी दुपारी ही चाचणी घेण्यात आली. 


प्रहार एकाच वेळी विविध टार्गेटला नेस्तनाबुत करू शकते. तसेच उन्हाळा,पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये लक्ष भेदू शकते. मोबाईल लॉन्चरद्वारे या मिसाईला लॉन्च करण्यात आले असून याची मारक क्षमता १५० किमी आहे. मिसाईलची लांबी ७.३२ मीटर असून तिचा व्यास ४२० मिलीमीटर आहे. मिसाईलचे वजन १.२८ तर ही मिसाईल २०० किलो वजन वाहून नेऊ शकते. प्रहारच्या चाचणीवेळी सेना प्रमुख जनरल बिपिन रावत, डीआरडीओ प्रमुख डॉ. जी सतीश रेड्डी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@