‘लोकसत्ता’ला विनय जोशी यांची नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |


 

 
 

मुंबई: ‘गोमातेची हत्या करणाऱ्या पाप्यास वेदांमध्ये देहान्त प्रायश्चित्त दिले जाते’ असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तोंडी थेट अग्रलेखातून खपवणाऱ्या द एक्स्प्रेस ग्रुपच्या लोकसत्ता या मराठी दैनिकाला लीगल राईट्स ऑबझर्व्हेटरी या संस्थेने नोटीस बजावली आहे. तसेच, सदर दैनिकाच्या संपादकांना बडतर्फ करावे व अग्रलेख मागे घेऊन बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही या संस्थेने केली आहे.

 

सदर संस्थेचे निमंत्रक विनय जोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. २१ सप्टेंबर रोजी लोकसत्ता या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या सूर नवे; पण पद्य..?’ या अग्रलेखात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कधीच न केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दै. लोकसत्ताने लिहिलेल्या अग्रलेखामध्ये २०१५ साली महंमद अखलाक याची केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या झाली असता सरसंघचालकांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला घ्यायला हवा.गोमातेची हत्या करणाऱ्या पाप्यास वेदांमध्ये देहांत प्रायश्चित्त दिले जाते’, इतकेच विधान त्या भयानक घटनेनंतर तीनच दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरसंघचालकांनी केले होते. असा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक, सरसंघचालक भागवत यांनी असे वक्तव्य कधीच केले नसल्याचे विनय जोशी यांनी म्हटले आहे.

 

या प्रकरणी द एक्स्प्रेस समूहाने लोकसत्ता दैनिकाच्या संपादकांना तात्काळ बडतर्फ करावे तसेच सदर अग्रलेख मागे घेऊन बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी विनय जोशी यांनी केली आहे. या मागण्या मान्य न केल्यास एक्स्प्रेस समूह व लोकसत्ताविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तसे झाल्यास संभाव्य परिणामांना सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. हा इशारा देतानाच, लीगल राईट्स ऑबझर्व्हेटरी संस्थेने लोकसत्ता दैनिकाचेच माजी संपादक कुमार केतकर यांना रा. स्व. संघ आणि हिंदू संघटनांबद्दल असत्य लिहिल्याप्रकरणी न्यायालयात खेचले होते व केतकर यांना राजीनामा द्यायला भाग पाडले होते, याचीही आठवण या पत्रकाद्वारे करून देण्यात आली आहे.

 

“एकतर माफी किंवा कारावास”

 

“संभ्रमात्मक लिहिणे, ही लोकसत्ताच्या अग्रलेखाची जणू सवयच झाली आहे. इतके दिवस हे सर्व कायद्याच्या कचाट्यातून सुटले. परंतु आता तर त्यांनी धादांत असत्य वाक्य थेट सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तोंडी घातले आहे. भा.दं.वि. ४९९ आणि ५०० नुसार एकतर माफी मागणे किंवा कारावास भोगणे अशा दोनच गोष्टी या प्रकरणात होऊ शकतात. दापोली, चिपळूण, गुहागर या व अशा पाच-सहा ठिकाणी पुढील काही दिवसांत तक्रारी दाखल होतील. तसेच, राज्यात आणखीही अनेक ठिकाणी तक्रारी दाखल होतील.”

 

-विनय जोशी, निमंत्रक, लीगल राईट्स ऑबझर्व्हेटरी

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@