साईनगर एक्सप्रेसवर दरोडा, लाखोंचा ऐवज लुटला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |



 


नाशिक: शिर्डीहून काकीनाडा, आंध्र प्रदेश येथे जाणाऱ्या साईनगर एक्सप्रेसवर गुरुवारी रात्री पडला. मनमाड-अंकाई दरम्यान सात ते आठ दरोडेखोर रेल्वेत शिरले. प्रवाशांना मारझोड करत महिला प्रवाशांचे ७ ते ८ लाखांचे दागिने लुटले. या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी औरंगाबाद रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

साईनगर एक्सप्रेस मनमाडहून काकीनाडाकडे जाण्यास निघाली. मात्र, अंकाई स्थानका दरम्यान साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली. सात-आठ जणांनी एक्स्प्रेसमध्ये घुसून वेगवेगळ्या बोगीतील प्रवाशांना मारहाण केली. महिलांना धमकावत ७ ते ८ लाखाचे सोन्याचे दागिने लुटून जंगलात पलायन केले. यानंतर गाडी नगरसुल स्थानकावर थांबली असता संतप्त प्रवाशांनी स्थानकात निदर्शने करत पोलिसांना सुरक्षेबाबत जाब विचारला. या लुटीच्या घटनेत दोन महिला जखमी असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. तर दरोडा प्रकरणी ७ ते ८ अज्ञतांविरोधात औरंगाबाद लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील तपास चालू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@