परकीय उद्योगांचे ‘इन्व्हेस्ट इन इंडीया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |
 
 
  
 सरकारच्या सकारात्मकतेमुळे मॉर्गन स्टेनली गुंतवणूक वाढवणार


मुंबई : केंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे भारताबाहेरील उद्योजकांचा देशात गुंतवणूक करण्याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे. मॉर्गन स्टेनली या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स गाॅर्मन यांनी एका मुलाखतीत भारतात आणखी गुंतवणूक करण्यास उत्सूक असल्याचे म्हटले आहे. विविध वित्त सेवा, बॅँकिंग क्षेत्रातील कंपन्या आणि अन्य गुंतवणूकदारांना सेवा देणाऱ्या मॉर्गन स्टेनली कंपनीची ३६ देशांमध्ये ६०० कार्यालये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण योजनांमुळे कंपनी भारतात आणखी गुंतवणूक करण्यास उत्सूक आहे, असे गाॅर्मन यांनी सांगितले आहे. गुंतवणूकीसाठी भारत एक संधी असल्याचेही ते म्हणाले.

 
 

केंद्र सरकारच्या पारदर्शी धोरण हे उद्योजकांसाठी चालना देणारे आहेत. सध्या जागतिक घडामोडींचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परीणाम जाणवत आहेत. शेअर बाजार, कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ आणि रुपयाची लोळण याचा भारताबाहेरील गुंतवणूकीवर फारसा परीणाम होणार नसल्याचेही भाकित गाॅर्मन यांनी केले आहे. रुपया चांगली कामगिरी करत असून भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेल्या भरारीमुळे हे उद्योगांना मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले आहेत. गाॅर्मन यांनी गुंतवणूकीसाठी दाखवलेल्या सकारात्मक पवित्र्यामुळे परकीय गुंतवणूकीचा ओघ वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जीडीपी दराचे अनुमान योग्य – देशात २०१९ मध्ये जीडीपी दर ७.५ टक्के राहील असा अंदाज आगस्टमध्ये मॉर्गन स्टेनलच्या एका अहवालातून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार एप्रिल ते जून या दरम्यान जीडीपी दर ८.२ टक्क्यांवर पोहोचला.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@