पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2018
Total Views |


 


नवी दिल्ली: भारताकडून पाकिस्तानसोबत होणारी चर्चा रद्द करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याची घटना समोर आली. या पार्श्वभूमीवर भारताने परराष्ट्रमंत्री स्तरावर पाकिस्तानसोबतची होणाऱ्या चर्चेस नकार दिला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये ही बैठक होणार होती. जम्मू काश्मीरच्या शोपियानमधून तीन एसपीओसहित चार पोलीस बेपत्ता झाले होते. दहशतवाद्यांनी या सगळ्यांचं अपहरण केलं होतं. त्यापैकी एका पोलिसाला त्यांनी सोडलं असून इतर तिघांची हत्या केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती.

 

न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार होत्या. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली म्हणून पाकिस्तान संबंधीच्या आमच्या धोरणात लगेच कोणताही बदल होणार नाही किंवा द्विपक्षीय चर्चाही सुरु होणार नाही असे असे भारताने स्पष्ट केले होते. 'पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांदरम्यानच्या पत्रव्यवहाराचा सन्मान राखत ही बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत दहशतवादावर चर्चा होईल असेही पाक पंतप्रधानांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या चर्चेमागे 'नापाक' इरादे असल्याचे सिद्ध झाले आहे.' असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगतले. यामुळे आता न्यूयॉर्क येथे दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची चर्चा होणार नाही असे रवीश कुमार यांनी जाहीर केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@