पुण्यात २ अल्पवयीन मुलीवर बलात्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |



 


पुणे: चॉकलेटचे अमिश दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना पुण्यातील हिंजवडी भागात समोर आली आहे. यामध्ये एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील एक गुन्हेगार अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

गणेश निकम (२२ वर्षे) असे त्यातील एका आरोपीचे नाव आहे. कासारसाई येथे राहणाऱ्या दोन मुली मंदिर परिसरात खेळण्यासाठी गेल्या होत्या. गणेश आणि त्याच्या साथीदाराने या दोघींना पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. यानंतर दोघांनी मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत मंदिरामागील जंगलात नेले आणि बलात्कार केला. या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी मुलींना दिली होती. त्यामुळे दोघींही कुटुंबियांना काही सांगितले नाही.

 

मंगळवारी यातील एका मुलीची प्रकृती बिघडल्याने पालकांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्या वैदकीय तपासानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यांचे पालक उसतोडीचे कामगार आहेत. या सर्व प्रकारची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. काही तासांमध्येच त्यांनी आरोपींना पकडण्यात यश आले. या सर्व प्रकारामुळे पूर्ण परिसरात संतापजनक वातावरण आहे.

 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@