उत्तराखंडने दिला गायीला राष्ट्रमातेचा दर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2018
Total Views |


 

डेहराडून : उत्तराखंड विधानसभेत गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत विधेयक बुधवारी उत्तराखंड विधानसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरले आहे. विधानसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील गो रक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव उत्तराखंडच्या पशुपालन मंत्री रेखा आर्य यांनी मांडला होता. यावेळी त्यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना गायीचे महत्व पटवून देऊन, गोहत्या रोखण्यासाठी गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा अशी विनंती केली होती. रेखा आर्य यांच्या प्रस्तावानंतर सर्वानुमते याला सहमती देण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@