आशियाई क्रीडा स्पर्धा आणि भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |


 

नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळांडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. आशियाई स्पर्धा आणि भारत यांच्यातील संबंध तसा जुना आहे. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप...
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

आशियाई स्पर्धा ही आशियाड स्पर्धा या नावाने सुद्धा ओळखली जाते. दर ४ वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जात. १९५१ साली दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळाचे आयोजन करण्याचा मान भारताला मिळाला होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी या आशियायी स्पर्धचे उदघाटन केले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या देखरेखीखाली आशियाई ऑलिम्पिक समितीने खेळ निश्चित केले आहेत. प्रथम क्रमांकाला सुवर्ण, दुसऱ्या क्रमांकाला रौप्य व तृतीय क्रमांकाला कांस्य पदक दिले जाते. भारताने या स्पर्धेचे यापूर्वी आयोजन दोनदा केले आहे.

 

१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा यंदा इंडोनेशियामध्ये आयोजित केले गेल्या होत्या. ही स्पर्धा १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या दरम्यान झाली. स्पर्धेची सुरुवात इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडडो यांच्या अधिकृत घोषणेने झाली यांनी केली. वैशिष्ट्य म्हणजे आशियाई स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राष्ट्रपतीने मोटारसायकलवर स्वार होऊन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात एन्ट्री घेतली. हा सोहळा इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील गाईलेरो बंग कार्लो (जीबीके) स्टेडियममध्ये संपन्न झाला. यदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण ४५ देशांचा सहभाग होता. त्यात तब्ब्ल ११ हजार अॅथलेट्स सहभागी झाले होते. यामध्ये ४० खेळ व ६७ स्पर्धा होत्या.

आशियाई स्पर्धेत भारताने या २९ खेळांमध्ये सहभाग घेतला :

Ø जलतरण

Ø तिरंदाजी

Ø धावणे

Ø बैडमिंटन

Ø बास्केटबॉल

Ø बॉक्सिंग

Ø कयाकिंग

Ø सायकलिंग

Ø घोडेस्वारी

Ø फुटबॉल

Ø गोल्फ

Ø जिम्नास्टिक

Ø हँडबॉल

Ø हॉकी

Ø जूडो

Ø कबड्डी

Ø रोइंग

Ø सेपक टॅकरॉ

Ø नेमबाजी

Ø स्क्वाश

Ø ताइक्वांडो

Ø टेबल टेनिस

Ø टेनिस

Ø वॉलीबॉल,

Ø कुश्ती

Ø वूशू

Ø भालाफेक

Ø नौकायन

या खेळांमध्ये भारताने एकूण ६९ पदक कमावली. यामध्ये १५ सुवर्ण, २४ रौप्य व ३० कांस्य पदकाचा समावेश आहे. भारताने २०१० व २०१४ च्या आशियाई स्पर्धेपेक्षा यावर्षी चांगली कामगिरी करत १० पदक जास्त मिळवली. भारतीय पुरुष गटाने हॉकीमध्ये भारताने केलेला ८६ वर्ष जुना विक्रम मोडला. तसेच अनेक नवीन विक्रमही विविध खेळांमध्ये रचले. आशियाई स्पर्धेची सांगता २ सप्टेंबर रोजी जकार्ता येथे झाली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान यावर्षी प्रथमच एका महिला खेळाडूने मिळवला. जपानची आघाडीची जलतरणपटू रिकाको इक्की हिने स्पर्धेमध्ये ६ सुवर्णपदक मिळवून हा मान मिळवला. आशियाडमध्ये पदकाच्या यादीत चीन हा अग्रेसर ठरला तर जपानने दुसरे स्थान मिळवले. १९९४ नंतर दुसऱ्यादा जपानने दुसरे स्थान मिळवले आहे. भारताला मात्र ८ व्या स्थानावरच समाधान मानावे लागले असले तरी भारतीय खेळांडूंनी केलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे.

-पराग गोगटे

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@